बुधवार, 24 अगस्त 2011

पवनार

 पवनार  हे  गाव वर्धा- नागपूर या महामार्गावर असून, ते वर्ध्यापासून सुमारे सहा कि.मी. अंतरावर आहे. येथील धाम नदीच्या काठावर स्व. विनोबा भावे यांचा आश्रम असून, यालाच परमधाम आश्रम म्हणतात. स्व. विनोबाजी भावे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1985 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावात झाला.
त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण बडोदा (गुजराथ) येथे झाले. नंतर हिंदु विद्यापीठात संस्कृत अध्ययन केले. तेथेच त्यांनी गांधीजींचे भाषण ऐकले व गुरु-शिष्टयांचा पत्रव्यवहार सुरु झाला.
त्यांनी वयाच्या 55 ते 68 पर्यात भू दान पदयात्रा केली. तत्पुर्वी आंध्र प्रदेशातील रामचंद्र रेड्‌डी या जमीनदाराने 100 एकराचे भुमीदान केले. जगाच्या इतिहासात पहिला क्षण असा होता की रक्ताचा एकही थेब न सांडता हजारो एकराचे भूदान मिळाले. या पदयात्रेनंतर 1970 साली विश्रांतीसाठी वर्धा जवळील पवनार येथील परमधाम आश्रमात परतले. गोपुरी येथे विनोबाजी भावे बरेच दिवस वास्तव्याला होते. त्यावेळी स्व. जमनालालजी तेथे एक कुटी बांधून राहत असत. तेथे आता गीताई मंदिर बांधण्यात आले आहे.  गीतेचे अठरा अध्याय विविध प्रकारच्या शीळावरुन कोरुन त्याचे स्तंभ उभे केले आहे. या मंदिराला छत नाही, मंदीराच्या भिंतीचा आकार दुरुन चरखा व गाईचा आभास निर्माण करणारा दिसतो.
विनोबांची गिताई येथे अमर झाली आहे.  या काळात गिताई, गिताप्रवचने असंख्य स्फुटविचार मागे ठेवून परावाणीने `रामहरी ` म्हणत 15 नोव्हेंबर 1982 मध्ये अनंतात विलीन झाले. धामनदीत आचार्य विनोबा भावे यांच्या पार्थिव शरीराला अग्नि देण्यात आला होता. यावेळी शासनातर्फे एक स्मारक बांधण्यात आले आहे. स्व. विनोबाजी भावे यांच्या पवनार आश्रमाला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, देशातील नामवंत लोकांनी भेटी दिल्या असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील सदस्य या ठिकाणाला भेटी दिल्या. तसेच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्याने अनेक देश विदेशातील पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतात. पवनार आश्रम येथे कुसुमताई देशपांडे व गौतम बजाज यांचे कायम वास्तव्य आहे.  

विश्व शांती स्तुप


        महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या या कर्मभुमीत  विश्वशांती स्तुपाची निर्मिती झाली. 4 ऑक्टोंबर 1933 रोजी जमनालालजी बजाज यांच्या परिचयाचे जपानी बौध्द भिक्षू महास्यवीर निचिदात्सु फुजीई हे महात्मा गांधी यांना वर्धा येथे भेटण्यासाठी आले. श्री. फुजोई हे प्रतीदिन गांधीजीच्या सत्याग्रह आश्रमच्या आजूबाजूला ड्रम वाजवून
 `` ना - म्यु - म्यो-हो-रे-गे-क्यो `` अशी  प्रार्थना म्हणत होते. या प्रार्थनेचे कारण विषद करतांना भिक्षू म्हणाले की भारताची स्वातंत्रता विश्वशांतीसाठी ही प्रार्थना म्हटल्या जाते. ही प्रार्थना आज ही विश्वशांती स्तुपाच्या  परिसरात असलेल्या बौध्द मंदीरात पहाटे साडे पाच सायंकाळी सहा वाजता म्हटल्या जाते.
        गांधीजीच्या अहिंसा आंदोलनाची चर्चा त्या काळात सर्व विश्वामध्ये सुरु होती. अहिंसेच्या आंदोलनामध्ये विश्वास ठेवणारे लोक सर्व विश्वामध्ये होते. तथापि फुजीई गुरुजी हे व्यक्तीमत्व अहिंसा विश्वशांतीसाठी परिचीत होते. फुजीई गुरुजींना विश्वास होता की गांधीजींच्या  अहिंसात्मक आंदोलनाला निश्चितपणे  यश मिळून देशाला  स्वातंत्र्य मिळेल. पूढे हा त्यांचा विश्वास सार्थ ठरला देशाला  स्वातंत्र्य मिळेल. महात्मा गांधी आणि फुजीई गुरुजी या दोन  महान व्यक्तींना जोडणारा दूवा म्हणजे वर्धा नगरी हे ठिकाण इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेला.
        पुज्य फुजीई गुरुजींची अंतिम इच्छा होती की गांधी विनोबांच्या कर्मभुमीत एक विश्वशांती स्तूपाची निर्मिती व्हावी. ज्या ठिकाणी हे विश्वशांती स्तुप आहे. त्याठिकाणाची पसंतीसुध्दा त्यांनी केली होती. परंतू त्यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत विश्वशांती स्तुपाची  निर्मिती होऊ शकली नाही, मात्र  फुजीई गुरुजी मेमोरीयल ट्रस्टने दानाच्या स्वरुपात सर्वसेवा संघ तथा कमलनयन बजाज चॅरीटेबल ट्रस्ट यांनी फुजीई गुरुजींच्या स्मृती सन्मानार्थ वर्धा येथे विश्वाशांती स्तुपाची निर्मिती करण्यात आली.
        विश्वशांती स्तुप 9 एकर जागेच्या  विस्तीर्ण परिसरात आहे. विश्वशांती स्तुपाच्या घुमटाच्या आच्छादनावर सुवर्णनानी बनविलेल्या  भगवान गौतम बुध्दाच्या प्रतिकृतीच्या  4 दिशांनी उत्तम विविध मंदिरांच्या  आकर्षक पध्दतीने ठेवलेल्या प्रतिकृती आहेत.  तसेच याच परिसरात भगवान बुध्दाचे मंदीर सुध्दा आहे. या मंदिरात सुवर्णकृत अलंकाराने बुध्दाची मुर्ती प्रतिष्ठापीत करण्यात  आली आहे. हे बौध्द मंदीर जापानी बौध्द मंदीरासारखे वाटते. मंदिरामध्ये निरव शांतता पसरलेली असते. पहाटे सायंकाळी 6 वाजता या मंदिरात प्रार्थना म्हटल्या जाते. अनेक देश विदेशातील पर्यटक या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. विश्वशांती स्तुपाचे भुमिपुजन 1989 साली महात्मा गांधीजीच्या पुत्रवधू निर्मलाबेन गांधी  यांचे हस्ते झाले  तर  13 जानेवारी 1993 साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते झाले.
        परमाणू युगात मानवजातीला विनाशातून वाचविण्यासाठी तसेच मानवजातीचे दु:ख दूर करण्यासाठी बुध्द धर्माचे आचार विचार आजही प्रेरणादायी ठरले आहे. शांतीचे अग्रदूत म्हणून संबोधील्या गेलेल्या गौतम बुध्दाचे कार्य सर्व मानव जातीला प्रगतीपथावर नेणारे आहे.