बुधवार, 24 अगस्त 2011

गीताई मंदिर


        गीता + आई = गीताई किंवा गीतामाता या विषयी आचार्य विनोबा भावे यांचे अथक चिंतन होते. सन 1915 मध्ये त्यांची माता रुख्मीनीदेवी यांच्या इच्छेनूसार मुळ गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. 7 ऑक्टोंबर 1930 मध्ये  गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचे काम सुरु केले. 1932 मध्ये मराठीतील गीता श्लोकाचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकाचे प्रकाशक जमणालालजी होते. मातृस्मरणमध्ये केलेल्या या कृतीला विनोबाजींनी नाव दिले गिताई.
गिताई मंदीराचे भुमिपुजन
        कमलनयन बजाज यांच्या कल्पनेतून साकारणाऱ्या या गिताई मंदिराचे भुमिपुजन जमनालालजी यांच्या 75 व्या जन्मदिनी 4 नोव्हेंबर 1964 मध्ये स्वत: विनोबाजींच्या हस्ते   संपन्न    झाले. नविनतम आणि मौलीक कल्पनेच्या आधारावर या प्रकल्पाचे प्रारुप तयार करण्यात आले. याप्रसंगी विनायक पुरोहीत यांचे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर योगदान मिळाले. त्यांनी देश विदेशातील विभिन्न स्मारकाचा अभ्यास करुन अवलोकन करुन स्थापत्य कला विशेषज्ञांशी सल्ला मसलत करुन या प्रकल्पाला पूर्णरुप दिले.
शिला लेख
        गीताई मंदीरात उभारण्यात आलेले शिलालेख हे  देशातील चारही बाजूने येथे आणलेले आहेत त्यामध्ये देशाच्या पूर्वेकडील उत्तर प्रदेशातून चूनार, महाराष्ट्राच्या पश्चिम क्षेत्रातून कोल्हापूर, उत्तर मध्यप्रदेश   राजस्थानातून क्रमश: करोल बुंदी दक्षिण भारताच्या  आंध्रप्रदेश, कर्नाटक तामिलनाडू या राज्यातून सुध्दा शिला लेख आणल्या गेले. त्यामुळे हे मंदिर संपूर्ण देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून सुध्दा समजल्या जाते.
        या शिलालेखाची निवड विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रमाणित प्रयोगाच्या आधारावर करण्यात आली आहे. शिलालेखावर वारा, सुर्य पाण्याचा परिणाम होणार नाही याचाही विचार करण्यात आला होता. शिलालेखाची ऊंची 9 फुट, चौडाई 2 फुट जाडी 1 फुट असुन शिलालेख 2 फुट जमिनीच्या आंत आहे. प्रत्येक शिला लेखावर गिताईचा एक श्लोक लिहिण्यात आला आहे. पर्यटकांना 8 ते 10 फुटाच्या अंतरावरुन सुध्दा गिताईचे श्लोक वाचता येतात. शिलालेखाच्या परिघाला चरखा गायीचा आकार देण्यात आला आहे. पुढील बाजूला चरख्याचा आकार  हे गांधीजीच्या स्मृतीचे प्रतीक असून गायीचे चिन्ह जमनालालजीच्या स्मृतीचे प्रतीक मानल्या गेले आहे. या शिलालेख मंदिराला परंपरागत अशी छत अथवा फरशी  नसून भिंतीसुध्दा नाहीत. दोन शिलालेखाचे अंतर 3 इंचांचे असून प्राकृतिक हवेचा संचार भरपूर उजेड असतो. याठिकाणी विनोबाजींची गिताई अमर झाली.
        गीताई मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार आकर्षक पध्दतीने बनविण्यात आले असून त्या समोरच स्वास्तिकच्या आकाराचा स्तंभ आहे. या स्तंभावर विनोबाजीनी आपल्या हस्ताक्षरात गीताई माऊली  माझी तिचा मी  बाळ नेणता, पडता रडता  घेई उचलू कडेवर अश्या ओव्या लिहिल्या असून त्यांचाशी विनोबाजींचा भावनिक संबंध आहे.
                हे मंदिर परंपरागत पूजेचे स्थान नसून ते ध्यान चिंतनाचे साधना  आहे. मंदिराच्या परिघामधील वातावरण शांत सात्विक आहे. मंदिराच्या आंत एक छोटे तळे बनविण्यात आले आहे ते नेपाल त्रिशुल नाटीच्या एका भागाची प्रतिकृती आहे.
        गीताई मंदीर कमलनयन बजाज चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली यांच्या मार्फत बनविण्यात आला असून सर्वसेवा संघाकडून 35 एकर जमीन या कार्यासाठी विनामुल्य देण्यात आली. या मंदिराचे उद्घाटन 7 ऑक्टोंबर 1980 मध्ये स्व. विनोबाजींच्या हस्ते करण्यात आले.
        या मंदिरातून गांधीजी, जमनलालजी आणि विनोबाजींच्या व्यक्तीमत्वाची विचारांचे सतत स्मरण होत असते. या परिसरात विनोबा  जिवन चित्रप्रदर्शनी, जमनालाल बजाज यांचे चित्र जीवनी प्रदर्शनी असून समोरच गांधी विचार अध्ययन केंद्र आहे. या स्थळाला अनेक देश विदेशातील पर्यटक  अभ्यागत शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी  विनोबाजी भावे यांच्या विचारांची शिदोरी घेवून जात असतात.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें