बुधवार, 24 अगस्त 2011

बोरधरण



        वर्धा जिल्ह्यांत एकमेव मोठे धरण म्हणजे बोरधरण प्रकल्प या नावाने प्रसिध्द आहे. वर्धा-नागपूर या महामार्गावर असलेल्या सेलू तालूक्यापासून अवघ्या 17 किलोमिटर अंतरावर असलेला या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात 1957 साली झाली. बोर नदीवर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम 1965 साली पूर्ण झाले.
        बोरधरण हे चारही बाजूंनी टेकड्यानी व्यापलेले आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 376.32 कि.मी. असून पर्जण्यमानाची सरासरी 1450 मि.मी. आहे. संपूर्ण पाणी साठा 138.75 द.ल.घ.मी. असून उपयुक्त पाणी साठा 127.42 द.ल.घ.मी.आहे.  पूर्ण संचय पातळी 330.40 मिटर आहे.
        या बोरधरणाला गेली अनेक वर्षे पर्यटक भेटी देवून निसर्गाचा आनंद लूटत होते. परंतू त्या ठिकाणी पर्यटकांसाठी मुलभूत सोयी नसल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडायचे. पर्यटकाचे बोरधरणा विषयी असलेले आकर्षण प्रेम यामुळे शासनाने बोरधरणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत केले.
        बोरधरणाच्या टेकडीवरच्या माथ्यावर पाटबंधारे विभागाचे एक विश्रामगृह आहे. परंतू ते पर्यटकांना सुख सुविधा देऊ शकत नसल्यामुळे धरणा लगतच्या वरील भागावर पर्यटकांसाठी राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून कक्ष बांधून देण्यात आले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या  सहलीसाठी एक मोठा हॉल सुध्दा बांधलेला आहे. ही सर्व बांधकामे शासनाच्या निधीतून करण्यात  आली असून प्रशासनाने ही विश्रामगृहे कंत्राटी पध्दतीने चालविण्यासाठी दिलेला आहे.
        बोरधरणाला आता जाण्यासाठी रिसॉर्ट विश्राम गृहापर्यंत डांबरीकरण रस्ते बनविले आहेत. पाण्यासाठी धरणाचे पाणी उपयोगात आणण्यात येत असते. तसेच आजूबाजूचा परिसर झाडे लावून सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात भरच पडत आहे. रिसॉर्ट मध्ये बसून जेवतांना अथवा नास्ता करतांना तुडुंब भरलेल्या तलावाचे मोठमोठ्या हिरव्यागार टेकड्याचे विलोभनीय दृष्याचा आनंद घेता येतो.
        पर्यटकाच्या सोयीसाठी लहान बालकांसाठी त्यांच्य मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असून पावसाळ्यामध्ये येथील परिसर अधिक विलोभनिय सुंदर नटलेला दिसतो. पक्षांची कु-कु वण्यप्राण्यांच्या आवाजाने आसमान दणाणून जातो. पर्यटकांना सुध्दा या आवाजाचा आनंद येथे लूटता येतो.शासनाने अलिकडेच बोर अभयारण्य म्हणून या परिसराला मान्यता दिली आहे. त्यामुळे या विस्तीर्ण परिसराच्या  जंगलामध्ये पर्यटकांच्या भटकंतीवर प्रतिबंध केला आहे. मात्र वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सकाळ पासून सुर्यास्तापर्यत  जंगल सफारी करता येते. या जंगलात रानडुकरे, ससे, कोल्हे, हरीण, मोर आदि वन्यप्राणी आढळतात.
        बोर धरणांत पर्यटकासाठी बोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून त्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
        आजच्या गतीमान व्यवस्थेत मनुष्याचे अस्तित्व लयास येत असून, अश्या पर्यटन स्थळामुळे जिवन जगण्याची अभिलाषा निर्माण होत असते. नव्हे तर आयुष्याला दिशा सध्दा मिळत असते. मानव विकासाचे केंद्र बिंदू म्हणून पर्यटन विकासाकडे पाहिल्या जात आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें