बुधवार, 24 अगस्त 2011

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प


धाम प्रकल्प
      धान नदी प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील महाकाळी गावाजवळ धाम नदीवर असून त्याखाली सुमारे 25 कि.मी. अंतरावर उन्नयी बंधारा बांधण्यात आला आहे. उन्नयी बंधा-याच्या  बाजुस उजव्या तिरावर 47.72 कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आहे.धरणाची घळ भरणी जून 1986 ला पूर्ण झालेली आहे. तसेच प्रकल्पाच्या  वितरण जाळ्याची कामे पूर्ण झाली असून त्याव्दारे 9500 हेक्टर सिंचन क्षमता जून 1995 मध्ये निर्माण झाली आहे. तसेच या प्रकल्पावर बिगर सिंचनाचे आरक्षण आहे. प्रकल्पाची सुधारीत किंमत 6320 लक्ष रुपये आहे.
      महाकाली संग्रहक धरण येथे मातीचे धरण असून, लांबी 1493 मीटर आहे. या धरणास 170 मी. लांबीचा ओगीविअर असून , महत्तम पूर विर्सग 5417 घ.मी./सेकंद आहे.
      धाम उन्नयी बंधारा अंतर्गत महाकाली संग्रहक धरणाखाली 25 कि.मी. अंतरावर धाम नदीवर बांधण्यात आलेला असून, मुख्य धरणातील पाणी या बंधा-यात साठविले जाते. बंधा-याची उंची नदी तळापासून 4.30 मीटर असून लांबी 32.05 मीटर आहे. बंधा-यामध्ये 16 स्वयंमचलीत गोडबोलेव्दारे बसविण्यात आलेली आहेत.
      वितरण प्रणाली अन्वये धाम उन्नयी बंधा-यावरुन 47.72 कि.मी. लांबीचा उजवा मुख्य कालावा आहे. पाच वितरीका 28.97 कि.मी.च्या आहेत. लघु कालवे  उपकालवे 75 हे 107 कि.मी. च्या आहेत.
      या प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र 7090 हेक्टर असून सिंचन क्षमता 9500 हेक्टर आहे. ते जिल्ह्यातील वर्धा हिंगणधाट व समुद्रपूर तालुक्यात मोडते. निर्माण झालेल्या सिंचन क्षमतेची हंगाम निहाय फोड पुढील प्रमाणे आहे.
खरीप  -2410 हेक्टर,रब्बी-3119 हेक्टर,उन्हाळी-354हेक्टर,दु.हंगामी-3404 हेक्टर
बारमाही-213 हेक्टर असे एकूण-9500 हेक्टर क्षेत्राला लाभ होतो.
      तसेच पीक रचना 134 टक्के आहे. प्रकल्पाच्या सिंचनास 1987-88 या वर्षापासून सुरुवात झाली. प्रकल्पाच्या  सिंचन व्यवस्थापनासाठी लाभक्षेत्रात पवनार व तरोडा येथे व्यवस्थापनेकरीता शाखा कार्यरत आहे. पवनार शाखा 1989 साली व तरोडा शाखा 1991 मध्ये उघडण्यात आली आहे. तसेच प्रकल्पांच्या पुच्छ क्षेत्रातील व्यवस्थापनेकरीता मांडगाव येथे सिंचन क्षमता पुढील  प्रमाणे आहे.
1) पवनार शाखा- 1645 हेक्टर,2) तरोडा शाखा- 3980 हेक्टर3) मांडगांव शाखा (प्रस्तावित)   - 3875 हेक्टर असे एकूण - 9500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो.
 प्रकल्प स्थळापासून उन्नयी घरणापर्यंत नदी पात्रामधून नदीच्या दोन्ही तिरावर 600 हेक्टर क्षेत्र उचल पध्दतीने ओलिताखाली आलेले आहे.
      प्रकल्प सन 1987-88 पासून ओलितास प्रारंभ करण्यात आला. गेल्या 3 वर्षा पासूनची सिंचनाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
सन 2008-09 या वर्षी रब्बी 3134 हेक्टर  आणि उन्हाळी 216 हेक्टर असे एकूण 3350 हेक्टरमधे सिंचनाची सोय झाली.
सन 2009-10 या वर्षी रब्बी 3270 हेक्टर  आणि उन्हाळी 250 हेक्टर
मधे असे एकूण 3520 हेक्टरमधे सिंचनाची सोय झाली.सन 2010-11 या वर्षी रब्बी 3005 हेक्टर  आणि उन्हाळी 191 हेक्टरमधे असे एकूण 3196 हेक्टरमधे सिंचनाची सोय झाली आहे.
      सिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठा
      धाम प्रकल्पातून नगर परिषद वर्धा पिण्याकरीता पाणी पुरवठा 5.79 दलघमी, वर्धा रेल्वे करिता 1.65 दलघमी आणि खेडे गावांकरीता (येळाकेळी, वैद्यकीय महाविद्यालय) 1.33 दलघमी असे एकूण 8.77 दलघमी पाणी पुरवठा केल्या जातो. या व्यतिरीक्त धाम प्रकल्पातून पुढील संस्थांना शासनाच्या मान्यतेने पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले. 
       औद्योगिक वापरासाठी लॉईड स्टील इंडस्ट्रिज, भुगाव करीता  3.65 दलघमी. आणि औद्योगिक महामंडळ (एम.आय.डी.सी.) करिता 3.99 दलघमी असे एकूण 7.64 दलघमी पाण्याचे आरक्षण आहे.
      दरवर्षी  खाजगी संस्थांच्या मागणीवरुन पाण्याचे आरक्षण धाम  प्रकल्पात करण्यात येते. तसेच जिल्हाधिकारी, वर्धा यांचे सूचनेनुसार पाणी वाटप समितीच्या सभेत ठरल्याप्रमाणे पिण्याचे पाण्याकरीता धाम नदीवरील गावासाठी पाणी आरक्षीत ठेवण्यात येत आहे.
बोरधरण प्रकल्प
        वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर गावाजवळ बोर नदीवर बांधलेला बोर प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम 1957 साली सुरु झाले व 1965 साली बांधकाम पूर्ण झाले. या प्रकल्पास पूर्ण करण्यास एकूण 388 लक्ष रुपयाचा खर्च झाला असून, सुधारित खर्च मार्च 2011 पर्यंत 621.17 लक्ष रुपयाचा खर्च आला आहे.
      या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 376.32 कि.मी. असून, अंदाजित साधारण पाण्याचा येवा 141.45 दलघमी आहे. प्रकल्पिय पाणी वाटप 109.85 दलघमी असून, बिगर सिंचन पाणी वापरात शासनाने मंजूर केल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी 1.61 दलघमी, औद्योगिक वापराकरीता 5.80 दलघमी, इतर मत्स्य व्यवसायाकरीता 55 द.ल.घ.मी. आरक्षित आहे.
      बोर जलाशयातील पाणीसाठा 138.75 दलघमी असून, उपयुक्त पाणी साठा 127.42 दलघमी आहे. या जलाशयातील लघूत्तम संचय पातळी 313.33 मीटर असून पूर्व संचय पातळी 330.40 मीटर आहे.
      बोर प्रकल्पाची सिंचन क्षमता 16194 हेक्टर असून, यामध्ये खरीप पिकासाठी 2834 हेक्टर रब्बी पिकासाठी 7368 हेक्टर, उन्हाळी पिकासाठी 324 हेक्टर, दुहंगामी पिकासाठी 5263 हेक्टर, बारमाही पिकासाठी 405 हेक्टरचा समावेश आहे. ओलीताखाली शेतजमीनीचे क्षेत्र 13360 हेक्टर आहे.
      मुख्य धरण मातीचे असून, त्याची लांबी 1158 मीटर व उंची 36.28 मीटर आहे. या धरणाच्या पाणी विसर्गासाठी 1.20x1.80 मीटर आकाराचे लिफ्ट गेट आहेत. या जलाशयासाठी 223 हेक्टर वनजमिन व 1232 हेक्टर खाजगी जमीनीचा उपयोग करण्यात आला आहे.बोर जलाशयातून एकूण 77 गावातील शेतीला सिंचनाचा लाभ मिळत असून, त्यात प्रामुख्याने सेलू तालुक्यातील अधिकतम गावाचा समावेश आहे.
                         लाल नाला प्रकल्प
      लाल नाला प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील कोरा गांवाजवळ स्थानिक नाल्यावर बांधण्यात येत असलेला मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्याच्या 345 हेक्टर व चंद्रपूर जिल्ह्याच्या  5055 हेक्टर  असे एकूण 5400 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत आहे. प्रकल्पास प्रशासकीय मान्यता रु. 685 लक्ष रुपयास दिनांक 31 ऑक्टोंबर 1983 ला प्राप्त झाली असून, या प्रकल्पास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर कडून रुपये 103.39 कोटीस तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या प्रकल्पावर आतापावेतो       रु. 83.558 कोटी झालेला आहे.
      धरणाच्या पाळीची लांबी 3385 मीटर व धरणाची महत्तम उंची 14.26 मीटर आहे. धरणाचा जलाशय साठा हा 29.515 द.ल.घ.मी. व सांडव्याची विसर्ग क्षमता 1207 घमी. प्रती से. आहे. प्रकल्पाचा सांडवा हा 70 मीटर लांबीचा असुन यास 12x3 मीटर आकाराचे 5 वक्रव्दारे बसविण्यात आलेली आहेत. सांडव्याच्या निर्गमन नाली वर सा.क्र.660 मीटरवर 3.20 मीटर उंचीचा प्राप्त आहे.
      प्रकल्पास डावा कालावा असून, धरणाच्या सा.क्र.1800 मीटरवर मुख्य विमोचक आहे. प्रकल्पाचा डावा कालवा हा लाल पोथरा, लभानसराड असा संयुक्त कालवा आहे. सा.क्र. 0 ते 6.905 कि.मी. हा लाल नाला, 6.905, 9.02 ते 16.54 कि.मी. लाल पोथरा व 16.54 ते 27.95 लाल पोथरा + लभासराड, 27.95 ते 32.14 लाल + पोथरा, 32.14 पोथरा व 37.14 ते 68.33 लाल नाला प्रकल्पाचा कालवा आहे.
        प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात उसेगाव, तळोदी व गणेशपूर ही तीन गावे येतात. या प्रकल्पाची सिंचन क्षमता 7290 हेक्टर असुन त्याव्दारे वर्धा जिल्ह्यातील २३ गावांना सिंचनाचा लाभ झाला आहे.
      लाल नाला प्रकल्पाच्या धरणाच्या पाळीचे काम घळभागासह सर्व अनुषंगिक कामासह पूर्ण झालेले आहे.सा.क्र.3120 ते 3190 यामध्ये ओगी पध्दतीचा असलेल्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून, सांडव्याच्या पुच्छ कालव्यावरील बांधकाम 88 टक्के काम पुर्ण झाले आहे. मुख्य विमोचक सा.क्र.1800 मीटर वर असून, त्याचे 100 टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे.
      लाल नाला प्रकल्पाच्या संयुक्त कालव्यापैकी 6.90 कि.मी. मुख्य कालव्याचे काम पुर्ण झाले असून त्यातुन पुढिल संयुक्त कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.
      प्रकल्पाच्या  7 कि.मी. व 9 ते 16.54 किमी मधील सर्व बांधकामे पुर्ण झालेली आहेत. लाल नाला प्रकल्पाची संयुक्त कालव्यांतर्गतची कि.मी. 32.14 ते 68.33 मधील कामे लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांचेकडे असून, ती प्रगती पथावर आहेत.
      लाल नाला डावा मुख्य कालवा 7 कि.मी. पर्यंत एकूण 6 लधु कालवे सर्व लघु कालव्याची कामे पुर्ण झालेली आहे व उर्वरीत मुख्य कालव्यावरील लघु कालव्याची कामे प्रगतीपथावर आहे.
      या प्रकल्पाकरीता 1601 हेक्टर खाजगी जमिन आवश्यक असून, संपुर्ण जमिन संपादन करण्याकरीता प्रस्ताव राजस्व विभागास पाठविण्यात आले असून त्यापैकी 1577 हेक्टर जमिन ताब्यात घेण्यात आली आहे.
      या प्रकल्पाकरीता 29.83 हेक्टर वनजमिनीची आवश्यकता असून, केंद्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झालेली आहे.
      लाल नाला प्रकल्पाचे बुडित क्षेत्रात उसेगांव, तळोदी व गणेशपूर ही गावठाणे येतात. या गावाच्या पुनर्वसनाच्या, नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली असून प्रकल्पग्रस्तांचे 100 टक्के स्थानांतर झाले आहे.
      या प्रकल्पाचया मुळ प्रकल्प अहवालानुसार सिंचन क्षेत्र 5400 हेक्टर व 7290 हेक्टर सिंचन क्षमता आहे. या प्रकल्पावर जुन 2011 अखेर 3567 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. प्रकल्पाच्या  एकूण 7290 हेक्टर पैकी 3308 हेक्टर सिंचन क्षेत्र कोळसा खदानी अंतर्गत येत आहे. कमी होत असलेले सिंचन क्षेत्राकरीता लाल नालाच्या बुडीत क्षेत्रातून उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
      सन 2010-11 मध्ये कालवे, प्रवाही, कालवा उपसा, नदी-नाले उपसा व जलाशय उपसा याव्दोर एकूण 310 हेक्टर सिंचन झाले आहे.
      या प्रकल्पावर जून 2011 अखेर रु. 83.77 कोटी  खर्च झालेला आहे. प्रकल्प मार्च 2012 अखेर पुर्ण करण्याचे नियोजीत आहे.
मदन  प्रकल्प
        मदन तलाव प्रकल्प हा वर्धा जिल्हयातील आर्वी तालूक्यातील मदन गावाजवळ  आहे. या प्रकल्पांतर्गत मदन गावाजवळ मातीचे मुख्य धरण बांधण्यात आले असून,त्याखाली सुमारे 12.00 कि.मी. अंतरावर वडगांव जवळ उन्नती बंधारा बांधण्यात आला आहे.या प्रकल्पापासून वर्धा जिल्हयातील सेलू तहसिलमधील 2535 हेक्टर जमीनीस सिंचनाचा लाभ  मिळणार आहे.
        मदन तलाव प्रकल्पास प्रशासकीय मान्यता रु.1.84 कोटी  दिनांक.1 जुलै 1979 ला प्राप्त झाली असून, तृत्तीय सुधारीत प्रशासकीय मान्यता विदर्भ पाबंधारे विकास महामंडळ, नागपूर  अन्वये रु.8809.21 लक्ष रुपयास प्राप्त आहे प्रकल्पावर जून 2011 अखेर पर्यंत रु.7756.58 लक्ष खर्च झाला आहे.
धरण प्रकल्पाची ठळक वैशिष्टये अंतर्गत  मदन मुख्य धरण (साठवण) मदन उन्नई धरण हि दोन धरणे येतात. मदन मुख्य धरण हे मदन गावाजवळ बांधण्यात आले असून, या धरणाची लांबी 1230 मी.व उंची 26.55 मी पाणीसाठा 11.46 द.ल.घ.मी. आहे. प्रकल्पास 140 मी.रुंदिचा सांडवा असून, निर्गमन नालीवर 1.80 मी.उंचीचा प्राप्त आहे.सांडव्याची क्षमता 662.5 घ.मी प्रती सेकंद आहे.
            मुख्य धरणाच्या खाली सुमारे 12 कि.मी अंतरावर मदन उन्नई धरण बांधण्यात आले असून, त्याची लांबी 3488 मी.व उंची 12.64 मी.व पाणीसाठा 3.72 द.ल.घ.मी आहे. या प्रकल्पास 157.80 मी.रुंदीचा सांडवा असून, 2.5 मी.उंचीचे ओगी पध्दतीचे मध्यवर्ती सांडवा बांधण्यात आलेला आहे.
            प्रकल्पास मदन उन्नई धरणापासून 11.52 कि.मी . लांबीचा मुख्य कालवा 13.17 कि.मी. लांबीचा डावा मुख्य कालवा आहे.प्रकल्पाची सिंचन क्षेत्र 2535 हे आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती मध्ये मुख्य धरणाचे बांधकाम मदन गावाजवळ मार्च 2003 ला पुर्ण झाले आहे. उन्नई धरणाचे बांधकाम जून 2005 ला पूर्ण झालेले आहे.प्रकल्पाच्या उजवा   डावा मुख्य कालव्याची कामे पुर्ण झाली असून वितरण प्रणालीची कामे 90 टक्के पुर्ण झालेली आहेत. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.
भुसंपादनामध्ये या प्रकल्पाकरीता 553.63 हेक्टर खाजगी जमीनीची आवश्यकता आहे.457.10 हेक्टर क्षेत्रात निवाडे ोषीत झाले आहे.56.53 हेक्टर जमीन संपादनाची कार्यवाही महसुल विभागाकडे सुरू आहे. 553.63 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.
वनजमीन अंतर्गत मुख्य धरणाकरीता लागणा-या 156.48 हेक्टर वनजमीनीस केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. उन्नयी धरणाकरीता लागणा-या 13.90 हेक्टर वन क्षेत्राच्या  प्रस्तावास अंतिम मान्यता पर्यावरण एवं वन मंत्रालय कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे.
पुनर्वसन कार्यामध्ये मदन  उन्नयी बंधा-याकरीता बुडीत क्षेत्रात येणा-या आमगांव ता.सेलू जि.वर्धा हया गावातील 105 कुंटूंबातील 469 व्यक्तीचे पुनर्वसन झाले आहे.
            या प्रकल्पाची सिंचन क्षमता 3270 हेक्टर असून, पुर्ण 3270 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. सन 2010-2011 वर्षात एकुण 1126 हेक्टर सिंचन करण्यात आले.
        प्रकल्पावर जून 2011 अखेर रु.7756.58 लक्ष खर्च झालेला आहे.हा  प्रकल्प 2013 मध्ये पुर्ण करणे नियोजित आहे.
                              000000
5) निम्न वर्धा प्रकल्प
गोदावरी खो-यातील वैनगंगा नदीची उपनदी असलेली वर्धा नदी ही अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहते. या नदीवर आर्वी तालुक्यातील धानोडी या गावाजवळ निम्न वर्धा जलाशयाचे बांधकाम पूर्ण होत असून उपलब्ध पाण्याचा अद्याप पावेतो पूर्णपणे उपयोग करण्यात आला नाही. सदर्हू जलाशय मा. पंतप्रधान पॅकेज मध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे.
      या प्रकल्पाला 9 जानेवारी 1981 रोजी प्रथमत: प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती त्यानंतर तिस-या सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची अद्यावत किंमत 2356.58 कोटी रुपये असून मार्च 2011 अखेरीस या प्रकलपावर 859 कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरीत 1497.58 कोटीचा खर्च यापुढे होणार आहे.
      या धरणाच्या बुडीत क्षेत्रात वर्धा जिल्ह्यातील 46 व अमरावती जिल्ह्यातील 17 गावे अशी 63 गावाची जमीन बाधीत झाली असून, जिल्ह्यातील 26 गावाचे पूर्नवसन झाले आहे.
      निम्न वर्धा जलाशयात पाण्याचा एकूण साठा 253.34 द.ल.घ.मी.(8.954 टी.एम.सी.) होणार असून प्रकल्पाची उपयुक्त क्षमता 216.87 द.ल.घ.मी.(7.6650 टी.एम.सी.) आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता 65025 हेक्टर होणार आहे.लाभक्षेत्रात लागवउी योग्य क्षेत्र 78 हजार 873 हेक्टर असून, सिंचन योग्य क्षेत्र 55 हजार 557 हेक्टर आहे. त्यामध्ये खरीप पिकासाठी 36563 हेक्टर व रब्बी पिकासाठी 18 हजार 994 हेक्टर खेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
      या  प्रकल्पाच्या कालव्यावरुन वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील 1026 हेक्टर, देवळी तालुक्यात 26920 हेक्टर , वर्धा तालुक्यात 9476 हेक्टर , हिंगणघाट तालुक्यात 6728 हेकटर अशी एकूण 44150 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. नव्याने प्रस्तावित केलेल्या उपसा सिंचन योजनेमुळे आर्वी तालुक्यातील 7 हजार हेक्टर व 3 बॅरेज मुळे देवळी तालुक्यातील 4407 हेक्टर अतिरीक्त सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे.माती धरणाचे व सांडव्याचे काम पूर्ण झालेले आहे.  
निम्न वर्धा मुख्य कालव्याची लांबी 44.425 किमी असून, मुख्य कालव्याचे काम पूर्ण झालेले आहे. या लांबीमध्ये एक 200 मी. लांबीचा बोगदा असून, दोन सरळ विमोचके व चार लघू कालव्याची कामे पूर्ण झालेली आहेत. तीन वितरीका व 15 लघूकालव्याचे काम प्रगतीपथावर आहेत.देवळी व गिरोली शाखा कालव्याची लांबी 37.390 कि.मी. असून, कालव्याचे 1 ते 15 कि.मी. चे काम पूर्ण झालेले आहे. 16 ते 25 मधील कामे प्रगतीपथावर असून, मार्च 2012 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देवळी शाखा कालव्यावर देवळी तालुक्यातील 4142 हेक्टर वर्धा तालुक्यातील 11087 हेक्टर अशी एकूण 15229 हेक्टर सिंचन क्षमता असून, त्यापैकी 2010-11 मध्ये 3139.31 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. गिरोली शाखा कालव्यावर देवळी तालुक्यातील 16443 हेक्टर व हिंगणघाट तालुक्यातील 8652 हेक्टर अशी एकूण 25095 हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 2010-11 मध्ये 5034 सिंचन क्षमता निर्माण झाली त्यामुळे लॅको विजताप केंद्राला पाणी देता येणार आहे. शासनास महसूल प्राप्त होऊन अतिरीक्त विज पाणी देता येणार आहे. शासनास महसूल प्राप्त होऊन अतिरीक्त िविज पाणी देता येणार आहे.
      वर्धा नदिवर पुलगाव येथे केंद्र शासनाचे दारुगेळा भांडार असून दारुगोळा भांडार व पुलगाव परिसरातील 13 गावात निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुलगाव शहरातील भिषण पाणी टंचाई दुर होणार आहे. सदर कामाचे अंदाजपत्रकानुसार 85 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर खर्डा बॅरेज ला विदर्भ पाटबंधारे महामंडळाने 20 नोव्हेंबर 2011 रोजी मान्यता दिलेली असून, बॅरेजची साठवण क्षमता 12.505 द.ल.घ.मी. असून, खर्डा बॅरेजला 12X6  मीटरचे 16 दरवाजे प्रस्तावित आहे. या बॅरेजमुळे 2071 हेक्टर पिक क्षेत्राला उपसा सिंचनाव्दारे पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. या खर्डा बॅरेजची किंमत 97.32 कोटी रुपये आहे.
      प्रकल्पाचा सुधारीत प्रस्तावानुसार  केंद्रीय जल आयोगा मार्फत निम्न वर्धा प्रकल्पाच्या तपासण्या पूर्ण होऊन दिनांक 4 जानेवारी 2011 रोजी त्यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली आहे. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचे पत्र दि. 5 जानेवारी 2011 नुसार पर्यावरण विषयक मान्यता या प्रकल्पाला प्राप्त झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें