बुधवार, 24 अगस्त 2011

सेवाग्राम


महात्मा गांधीजी यांच्या वास्तव्याने पुनित झालेले सेवाग्राम वर्धेपासून अवघे सात किलोमिटर अंतरावर आहे. पूर्वी सेवाग्रामसाठी जाणे येण्याची सुविधा नसल्यामुळे अनेकांना कष्ट सहन करावे लागत होते. परंतू आता मात्र वर्धेवरुन जाण्यायेण्याच्या मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असल्यामुळे परदेशातील देशातील असंख्य पर्यटक शैक्षणिक सहली या ठिकाणी भेटी देत असतात. महात्मा गांधीजींच्या या प्रेरणादायी स्थळातून त्यांचे स्मृती दर्शन होते.
            सत्य अहिंसेचे पुजारी असलेले मोहनदास करमचंद गांधी  यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला. ते बालपणापासून दृढनिश्चयी सत्यवचनी होते. शालेय जीवनात सर्वसाधारण प्राथमिक माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर बॅरीस्टर होण्यासाठी इंग्लडला गेले. गांधीजी बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले.
            इंग्रज प्रशासनाने भारतीयांवर जुलूम, जबरदस्ती अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी महात्मा गांधीजींनी  आंदोलने उभारली, बलाढ्य सामराज्यांशी लढा देताना त्यांनी अहिंसात्मक पध्दतीने आपला लढा चालविला.
            12 एप्रिल 1930 रोजी मिठाचा सत्याग्रहासाठी दांडी यात्रा काढली त्यांनी कायदा तोडल्याने 5 मे 1930 रोजी त्यांना येरवडाच्या जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. 1933 मध्ये  त्यांची सुटका     झाली. त्यानंतर देशव्यापी यात्रा करुन आल्यानंतर गांधीजी जानेवारी 1935 च्या शेवट वर्धेतील मगनवाडी येथे वास्तव्य आले. त्यानंतर बापू 30 एप्रिल 1936 ला पहिल्यांदा सेवाग्रामला आले. पूर्वी सेवाग्रामचे नांव शेगांव असे होते. दांडी यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी गांधीजीनी निर्धार केला होता की पूर्ण विजय प्राप्ती नंतर साबरमती आश्रमात परत येईल, दरम्यान वर्धेचे जमनलाल बजाज यांच्या विनंतीवरुन ते वर्धेला आले.
                        आदि निवास
            भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा 1942 मध्ये आदि निवासात झाली होती तसेच 1940 चे व्यक्तीगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारी सुध्दा याच निवासस्थानातून झाली. आश्रमवासियाच्या परिश्रमाने स्थानिक कारागीरामुळे आदि निवास बांधण्यात आले. या निवास्थानामध्ये बापू बा, प्यारेलालजी, संत तुकडोजी महाराज, खान अब्दुल गप्फार खॉ इतर दूसरे आश्रमवासी आमंत्रीत लोकसुध्दा राहत असे. याठिकाणी लेखण, पठण, कताई इतर सर्व कामे केल्या जात होते. गांधीजीच्या इच्छेनुसार त्यांच्या देहांतानंतर या ठिकाणाला आदि निवास संबोधण्यात येत आहे.
                        बापुकुटी
            आदि निवासात लोकांची गर्दी  वाढल्यामुळे गांधीजींच्या नियमित कार्यात अडथळा येऊ लागला हे लक्षात आल्यानंतर मीराबहन यांनी त्यांच्यासाठी दोन कुट्या तयार केल्या होत्या. आज त्याला बापूकुटी बापू दप्तर या नावाने ओळखले जाते. या बापूकुटीत गांधीजीचे बसावयाचे आसन, त्या असनावर कोरलेले  `ऊॅ ` बाजूला कंदिल, पेटीत चष्मा इतर साहित्याची जपणूक करुन त्याच्या आठवणी जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजूलाच त्यांच्या खडाऊ लाठी  हे साहित्य स्मृती म्हणून  आहे                                             बापू-कुटि ही माती, बांस तथा देशी कवेलू आदि साहित्यानं बनलेली असून मीरा बहनने आपल्या सुंदर कलेतून `ऊॅ `, खजूर झाड, मोर तथा चरखा बनविला होता. हे कमश: ईश्वर, प्रकृति, जीवित प्राणी तथा मानव प्रवृत्तीचे प्रतिक म्हणून समजल्या जात होते. खजूरच्या पत्याने बनविण्यात आलेल्या चटईवर बसून गांधीजी आपले अविश्रांत काम करीत असत. बैठकीच्या उजव्या बाजूला काचेच्या आलमारीत ते चरखा, थुंकदानी, पाणी पिण्याची शिशी तसेच लाकडीच्या छोट्या पेटीमध्ये प्रथोपचाराचे साहित्य ठेवीत असत. चिनी मातीचे तीन बंदरवाली मुर्तीसुध्दा यामध्ये ठेवण्यात येत असे. काचेच्या आलमारीमध्ये गांधीजी आपल्या खडाऊ आणि लांब अशी काठी ठेवीत असे.
            या बापूकुटीमध्ये राष्ट्रीय नेत्यासोबत राजनैतीक चर्चा सुध्दा ते करीत होते. या कुटीच्या दुसऱ्या खोलीत गांधीजींचा सेप्टीक टँकवाला संडास, बाजूला लाकडी पेटी आहे.  वृत्तपत्र वाचणे त्यात सुधारणा करण्यासाठी या पेटीचा उपयोग केला  जात होता. बाजूला मालिश टेबल झोपण्यासाठी खाट ठेवलेली आहे, ते त्याचा नियमीतपणे उपयोग करायचे यावरुन त्यांची साधी राहणी, साधे विचार यावरुन  त्याचे जिवनातील कलेचा मर्म समजून येतो.
                        गांधीजींचे कार्यालय
            गांधीजीच्या कार्यालयामध्ये महादेवभाई, प्यारेलाल आणि सुश्री राजकुमारी अमृतकोर तथा अन्य सहयोगी कार्य करीत होते. या कार्यालयात टेलीफोन, सर्प पकडण्याचा  पिंजरा आहे.
                        `बा ` कुटी
            गांधीजीच्या सोबतीला कस्तुरबा गांधी राहत होत्या परंतू त्यांना असुविधांचा अनेक वेळा सामना करावा लागल्यामळे अखेरीस जमनालालजी बजाज यांनी `बा ` साठी  वेगळी कुटी बनवली त्याला बा-कुटी संबोधण्यांत आले. आजही ही कुटी आश्रमांच्या परिसरांत आहे.
                        आखरी निवास
            श्री. जमनालालजी बजाज यांनी स्वत:साठी आखरी निवास बांधले. या कुटीत शांतीदास तथा लार्ड लोधियन राहत होते. प्रारंभी डॉ. सुशीला नैयर यांनी या गावातील लोकांचे उपचार केले त्यानंतर आखरी निवास कुटीमध्ये कस्तूरबा ¤ü¾Ö֏ÖÖÖÖ  सुरु केला. तो आजही कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावाने प्रसिध्दीस आहे.
 गांधीजी 1946 च्या ऑगष्ट महिन्यात  खोकला सर्दीने आजारी झाले डॉक्टरांच्या सल्याने त्यांना कुटीमध्ये राहावे लागले त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. 25 ऑगस्ट 1946 रोजी ते दिल्लीला गेले, तेथून ते नौआखाली या गावाला गेले  परतीत ते दिल्लीला आले. 2 फरवरी 1948 रोजी  सेवाग्रामला परत येणार होते. दुर्देवानी 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गांधीजी परत आले नाही म्हणून या कुटीला आखरी निवास म्हणून संबोधण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी बौध्द धर्म साधक  धर्मानंद कोसंबी यांनी आमरन  उपोषण करुन आपले प्राण त्यागले.
            सेवाग्रामच्या परिसरात प्रार्थना स्थळ, रसोई घर, भोजन स्नान, महादेव कुटी, किशोर निवास, परचूटे कुटी, रुस्तम भवन, नयीतालीम परिसर, गौशाला, शांती भवन आंतरराष्ट्रीय छात्रावास, डाकघर, यात्री निवास गांधी चित्र प्रदर्शनी आदि सेवाग्रामच्या वैभवात स्मृतीत भर घालणाऱ्या  वास्तु ऊभ्या आहेत. सेवाग्रामचे पावित्र्य देशापुरते राहीलेले नसून ते अंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहे. सेवाग्राम ही विचारांची शक्तीस्थळ म्हणून गणल्या जात असते. या परीसरांतील सत्य-अहिंसा शांतीचा संदेश सर्व दूर पोहचलेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें